सुशांतच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का ! ‘छिछोरे’ सिनेमा पाहून मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या चाहतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या मुलीजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या मृत्यूनं ती दु:खी होती. तिला या घटनेचा जबरदस्त धक्का बसला होता. म्हणून तिनं आयुष्य संपवलं असा मजकूर तिच्या या नोटमध्ये तिनं लिहला आहे. तिंन आत्महत्येपूर्वी सुशांतचा छिछोरे हा सिनेमाही पाहिला होता. छत्तीगडच्या भिलाई इथं ही घटना घडली.

आधी पाहिला सुशांतचा सिनेमा नंतर केली आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सदर मुलीची आई दोन मुलांना घेऊन माहेरी गेली होती. ही मुलगी घरात मोठी होती. तिचे वडिल रायपूरमध्ये एका खासगी कंपनी नोकरी करतात. तिनं छिछोरे हा सिनेमा पाहिला. नंतर वडिलांसोबत यावर चर्चाही केली. नंतर घरात कोणी नसताना तिनं गळफास घेतला.

नेमंक काय घडलं ?

सदर मुलीच्या वडिलांनी तिच्यासोबत थोडा वेळ बसून तिच्यासोबत सुशांतचा छिछोरे सिनेमा पाहिला. यावर त्यांनी थोडी चर्चाही केली. यानंतर त्यांना बाजारात जायचं होतं. त्यांनीही मुलीलाही सोबत येणार का असं विचारलं. परंतु तिनं मात्र सोबत येण्यास नकार दिला. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वडिल बाजारात गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. मुलीनं गळफास घतेला होता. वडिलांच्या रडण्याचा आवाज ऐकचा शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. यानंतर मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.