सुशांत सिंह राजपूत सुसाईड केस : आता मुंबई पोलीस नोंदवणार अभिनेत्री कंगना राणावतचा जबाब ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्याच्या आत्महत्येमुळं पूर्ण देश हादरला होता त्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी आतापर्यंत 30 लोकांची चौकशी केली आहे. अद्यापही त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. आता अशी माहिती आहे की, काही दिग्गजांचीही चौकशी केली जाणार आहे आणि काही लोकांचा जबाबही नोंदवला जाणार आहे. काहींची पुन्हा एकदा चौकशी केली जात आहे. ताज्या रिपोर्टनुसार, आता अभिनेत्री कंगना रणौतचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे.

जेव्हा सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली तेव्हा कंगना रणौतनं व्हिडीओ शेअर करत बॉलिवूडमधील गटबाजी आणि भाई जातिवादावर भाष्य केलं होतं. इंडस्ट्रीतील अनेक बड्या लोकांनी सुशांतकडे दुर्लक्ष केल्यानं तो डिप्रेशनमध्ये गेला असं ती म्हणाली होती. आतापर्यंत अनेक व्हिडीओ शेअर करत तिनं यावर भाष्य केलं आहे. हा एक प्लॅन्ड मर्डर आहे असंही ती म्हणाली होती.

एका इंग्रजी वृत्तानुसार, या प्रकरणी काही लोकांची चौकशी तर नाही होणार परंतु त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यांचं मत विचारलं जाणार आहे. यात कंगना रणौत आणि डायरेक्टर शेखर कपूर यांचा समावेश आहे. कारण या लोकांनी सुशांत नेपोटीजमला बळी पडल्याचं म्हटलं होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांची चौकशी होणार आहे. अद्याप त्यांना समन्स बजावण्यात आलेला नाही. अशीही माहिती आहे की, यश राज फिल्म्सची कास्टींग डायरेक्टर शानू शर्माचीही चौकशी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती कास्टींग डायेरक्टर म्हणून काम पहात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like