‘खिलाडी’ अक्षयनं YouTuber ला पाठवली 500 कोटींच्या मानहानीची नोटीस ! सुशांतचे Fake व्हिडिओ बनवून कमावले होते लाखो रुपये

पोलीसनामा ऑनलाइन – बिहारमधल्या एका यूट्यूबरवर बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चे फेक व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी जेव्हा तपास केला गेला तेव्हा अशी माहिती समोर आली की, या व्यक्तीनं गेल्या 4 महिन्यांत सुशांतचे फेक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून तब्बल 15 लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे. राशिद सिद्दीकी (Rashid Siddiqui) असं या व्यक्तीचं नाव आहे. तो 25 वर्षांचा आहे असंही समजत आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police), महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra), मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या विरोधात राशिदनं चुकीची माहिती देणारे व्हिडिओ पोस्ट केले होते. मुंबई पोलिसांनी या यूट्यूबरविरोधात एफआयआर दाखल केली आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमार यानं या यूट्यूबरला 500 कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

राशिद हा इंजिनियर आहे. त्यानं एफएफ न्यूज (FF NEWS) नावानं यूट्यूब चॅनेल सुरू केला होता. एका इंग्रजी वृत्तानुसार, राशिदवर बदनामी, सार्वजनिक गैरव्यवहार आणि हेतुपुरस्सर अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या विरोधात राशिदनं पोस्ट केलेल्या व्हिडिओजला लाखो व्ह्यूज मिळाले होते. यात अपमानकारक कंटेटचा समावेश होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर शिवसेनेच्या लीगल सेलचे वकील धर्मेंद्र मिश्रा यांनी राशिद विरोधात केस केली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी राशिद विरोधात मानहानी, पब्लिक मिसचीफ आणि जाणूनबुजून एखाद्याचा अपमान करणं अशा आरोपांखाली केस दाखल केली आहे. कोर्टानं राशिदला या अटीवर जामीन दिला की, तो पोलिसांना पुढील तपासात सहकार्य करेल.

अक्षय कुमारनं का पाठवली नोटीस ?

राशिदनं त्याच्या यूट्यूबवरून अक्षय कुमार विरोधात एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यानं चुकीची माहिती दिली होती. सुशांतला एमएस धोनी सिनेमा मिळाल्यानंतर अक्षय नाखूश होता. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अक्षयनं मंत्री आदित्य ठाकरेंसोबत एक सिक्रेट मीटिंग घेतली होती आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)ला कॅनडाला जाण्यासाठी मदत केली होती. आता पूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर अक्षयनं राशिदला मानहानीची नोटीस पाठवली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत बोलताना सांगितलं की, सुशांतचा मृत्यू लोकांना पैसे कमावण्याचं साधन बनलं. कारण लोक या केसमध्ये रस घेत होते. लोकांनी या केसमध्ये विविध स्टोरीज दाखवायला सुरुवात केली. अशात यूट्यूबर्सनाही फेक कंटेट टाकण्याची संधी मिळाली. राशिदने मुंबई पोलिसांची इमेज खराब करत पैसे कमावले असंही ते म्हणाले.