सुशांतनं ‘यश राज फिल्म’शी केलेल्या ‘कॉन्ट्रॅक्ट’ची कॉपी पोलिसांच्या ताब्यात, आतापर्यंत 15 जणांचे जबाब ‘रेकॉर्ड’, समोर येऊ शकते धक्कादायक माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्याच्या आत्महत्येची केस ब्रांद्रा पोलीस ठाण्यात नोदंवली गेली असून या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलीस करत आहे. नुकतीच पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.

डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सुशांत सिंह राजपूतच्या केसमधील महत्त्वाची माहिती हाती लागल्याचं सांगिलत आहे. तपास करताना पोलिसांना सुशांत सिंह राजपूतनं साईन केलेली यशराज फिल्म्सची कॉन्ट्रॅक्ट कॉपी मिळाली आहे. मुंबई झोन 9 चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजेरियल स्टाफसह आतापर्यंत 15 लोकांचा या प्रकरणी जबाब नोंदवण्यात आला आहे. बांद्रा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केस प्रकरणी मुंबई पोलीस आता सुशांतच्या जवळच्या लोकांची चौकशी करत आहेत. डायरेक्टर मुकेश छाबडानंतर आता पोलिसांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला गुरुवारी (दि 18 जून) बांद्र्याच्या पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. रिपोर्ट्सनुसार रियाची तब्बल 10 तास चौकशी झाली आहे. यावेळी रियाच्या फोनमधील फोटो आणि व्हिडीओ यांचीही तपासणी झाली. या चौकशीत रियानं अनेक खुलासे केले आहेत.