सुशांतच्या पटण्यातील घरी गेले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, घेतली कुटुंबाची भेट !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडसह त्याचे लाखो चाहते आणि कुटुंबीय आजही दु:खात आहे. राजकीय क्षेत्रातही ही दु:खाची लाट पसरली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकतीच सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाची भेट घेतली आणि संवेदना व्यक्त केल्या. रविशंकर प्रसाद यांनी त्याची आठवण काढत एक इमोशनल ट्विटही केलं आहे.

रविशंकर प्रसाद यांनी घेतली सुशांतच्या कुटुंबाची भेट

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी (दि 19 जून 2020) सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाची भेट घेतली. सुशांतच्या पटण्यातील घरी जाऊन ते सुशांतच्या वडिलांना भेटले. या भेटीचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रविशंकर प्रसाद यांनी सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्विट करत ते म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतच्या पटण्यातील घरी गेलो होतो. कुटुंबाची भेट घेतली. एका सुपर टॅलेंटेड अ‍ॅक्टरच्या अशा जाण्यानं दु:ख होत आहे. त्याच्या जाण्यानं आता सिनेमातील क्रिएटीव्ह अ‍ॅक्टींग कमी होणार आहे. त्याला खूप उंचावर जायचं होतं. तो यापेक्षा जास्त डिजर्व करत होता.”