‘दिल बेचारा’ आधी सुशांतनं केले होते 10 सिनेमे ! किती आहे बॉक्स ऑफिसवरील ‘सक्सेस रेट’ ? जाणून घ्या

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा दिल बेचारा या सिनेमाची चाहते आतुरतेनं वाट पहात होते. लवकरच चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. अ‍ॅक्ट्रेस संजना संघी हिनं लिड रोल केला आहे. तर मुकेश छाबडानं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. केवळ चाहतेच नाही तर स्टार कास्टही सिनेमासाठी भावूक होताना दिसत आहे. आजच (दि 24 जुलै 2020, वार- शुक्रवार) हा सिनेमा रिलीज होणार आहे. सुशांतनं अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. त्याच्या शेवटच्या सिनेमाच्या आधी त्याच्या करिअरवर एक नजर टाकूयात. त्याच्या सक्सेसचा स्ट्राईक रेटही आपण पाहणार आहोत.

1) छिछोरे – याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुशांतचा छिछोरे हा सिनेमा रिलीज झाला होता. नितीश तिवारी डायरेक्टेड या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 150 कोटी झालं होतं.

2) ड्राईव्ह – छिछोरेच्या आधी सुशांतचा ड्राईव्ह हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. हा त्याचा डिजिटल डेब्यू होता. सिनेमात जॅकलीन फर्नांडिस देखील होती. हा सिनेमा फ्लॉप झाला.

3) केदारनाथ – 2018 मध्ये सुशांतनं सारा अली खान सोबत केदारनाथ हा सिनेमा केला होता. सिनेमानं 82 कोटींची कमाई केली होती.

4) राबता – राबता सिनेमात सुशांत आणि कृती सेनन यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा प्रेक्षकांना इम्प्रेस करू शकला नाही. सिनेमानं 26 कोटी कमावले होते.

5) ब्योमकेश बख्शी – या सिनेमात सुशांतनं डिटेक्टीवचा रोल साकारला होता. सिनेमा फ्लॉप झाला. परंतु सुशांतनं घेतलेल्या मेहनतीचं खूप कौतुक झालं होतं.

6) पीके – आमिर खानचा पीके सिनेमा ऑल टाईम ब्लॉकबस्टर मानला जातो. यातील सुशांतच्या रोलचंही कौतुक झालं होतं. सिनेमानं 300 कोटीहून अधिकची कमाई केली होती. सुशांत आणि अनुष्का शर्मा यांची केमिस्ट्री साऱ्यांनाच आवडली होती.

7) एम एस धोनी – सुशांतच्या करिअरमध्ये हा सिनेमा गेम चेंजर मानला जातो. या सिनेमात सुशांतनं कमाल केली होती. आजही हा सिनेमा आवडीनं पाहायला जातो. या सिनेमानं 130 कोटीहून अधिक कमाई केली होती.

8) शुद्ध देसी रोमांस – मनीष शर्मा डायरेक्टेड हा सिनेमा रोमँटीक सिनेमा होता. सिनेमाला क्रिटीक्सचं तर जास्त प्रेम नाही मिळालं परंतु बॉक्स ऑफिसवर सिनेमा एवढी कमाई केली की, सिनेमा सेमी हिट मानला जातो. यात परिणिती चोपडा सुशांत सोबत लिड रोलमध्ये दिसली होती.

9) सोनचिडीया – या सिनेमात सुशांत एकदम वेगळ्या रोलमध्ये दिसला होता. सिनेमात सुशांत डाकू बनला होता. सिनेमानं खूप कमाई केली परंतु हिट नाही मानला गेला.

10) काय पो छे – 2013 साली आलेल्या काय पो छे या सिनेमातून या सिनेमातून सुशांतनं डेब्यू केला होता. पहिल्याच सिनेमात त्यानं साऱ्यांचं मन जिंकलं होतं.

जर सुशांतच्या डेब्यूनंतरच्या 9 सिनेमांची समीक्षा केली तर असं लक्षात येतं की, त्याच्या सक्सेसचा स्ट्राईक रेट हा 67 च्या जवळ आहे. 9 पैकी त्याचे 5 सिनेमे हिट झाले आहेत. अशात आता त्याचा 10 वा सिनेमा किती कमाल करतो हे लवकरच कळेल.