अभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलाय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूबद्दल सीबीआयमध्ये सुरु असलेला तपास आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. दुसरीकडे, नार्कोटिक्स ब्युरो अमली पदार्थांची चौकशी करत आहे. या प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक तसेच अनेक ड्रग्ज डीलरला अटक केली आहे. चौकशीवेळी सारा अली खान, दीपिका पादुकोण, राकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर या मोठ्या सेलिब्रिटींची नावे समोर आली आहे. अशातच आता बॉलिवूड निर्माता मधू मंटेना वर्मा याचंही नाव उघडकीस आलं आहे. ड्रग्ज चॅट प्रकरणात तो अडकण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज चॅट मध्ये झालं उघड
मधू मंटेनाचे सुद्धा ड्रग चॅट समोर आलं असून, त्यामध्ये तो जया साहाकडे वीड मागणी करत आहे. त्याच्या मागणीस प्रतिसाद देत जयाने वीड पाठवण्यात येईल, असे सांगितले होते. याप्रकरणी एनसीबी आज मधुची चौकशी करत आहे. मधू आणि जया यांना समोरा समोर बसवून ही चौकशी करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मधू आणि ज्या दोघे देखील क्वान कंपनीशी संबंधित आहेत.

कोण आहे मधु मंटेना
मधू मंटेना वर्मा सिनेमा निर्माता असून त्याने हिंदी, तेलगू आणि बंगाली भाषेत सिनेमांची निर्मिती आणि वितरण केलं आहे. २००८ साली मधुने आमिर खानच्या ‘गजनी’ या सिनेमाची सहनिर्मिती केली होती. हा सिनेमा तेव्हाच सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. मधू मंटेना फॅंटम फिल्म्सचा सह-संस्थापक आहे. या कंपनीने लुटेरा, हंसी तो फंसी, बॉम्बे वेल्वेट, अगली, रक्तचरित्र, ऑटोग्राफ, क्वीन यांसारख्या बॉलीवूड सिनेमांची निर्मिती केली. तसेच स्वतंत्र निर्माता म्हणून उडता पंजाब, रमण राघव २.०, सुपर ३०, ट्रॅप्ड, हायजॅक, मनमर्जिया, शानदार आणि हंटर या सिनेमांचीही निर्मिती त्याने केली आहे. आता ड्रग्ज चॅट प्रकरणात त्याचं नाव समोर आल्यानंतर त्याला बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

नीना गुप्ता यांच्या मुलीशी झालेलं लग्न
अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताशी मधुने लग्न केलेलं. मात्र, मागील वर्षी ते दोघे वेगळे झाले. मसाबाला सोडचिट्टी देण्याआधी मधू अभिनेत्री नंदना सेनसोबत रिलेशन शिपमध्ये होता.