ड्रग्सच्या केसमध्ये रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर अंकिता लोखंडेनं दिली पहिली प्रतिक्रिया, ‘या’ गोष्टी सांगितल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित ड्रग केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या अटकेवर अंकिता लोखंडेने पहिली प्रतिक्रिया दिली. सुशांतची आधीची गर्लफ्रेंड असणारी अंकिता म्हणाली आपण जे कर्म करतो त्यावरून आपले नशीब ठरते.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला NCB ने ड्रग संदर्भात अटक केली आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की रियाची तीन दिवस चौकशी केल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.

तिची रविवारी सहा तास आणि सोमवारी आठ तास विचारपुस करण्यात आली. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला याआधीच अटक करण्यात आली आहे.

आज रियाला अटक केल्याची बातमी समोर येताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने एक हॅशटॅग ट्विट केलं, तिने लिहिलं की, ‘देव आमच्या सोबत आहे.’

अंकिता लोखंडे सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी वारंवार करत होती. आज तिने सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीच्या ट्विटला रिट्विट करत लिहिलं की आम्ही सुशांतच्या कुटुंबियांसोबत आहोत.

अंकिता सोशल मीडियावर सलग जस्टीस फॉर एसएसआर असं लिहीत राहिली. तिने रियाच्या त्या दाव्यांना खोटं ठरवलं ज्यात रियाने सांगितलं होतं की सुशांत डिप्रेशन मध्ये होता.