युरोप ट्रिपवर असताना सुशांतनं पाहिलं ‘हे’ पेंटिंग अन् ‘दृष्टीकोन’च बदलला, पाहा ‘ते’ चित्र

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता रिया चक्रवर्तीने अशी धक्कादायक कहाणी सांगितली आहे की ज्याने सर्वांनाच चकित केले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये सुशांत, रिया आणि शोविक इटलीच्या फ्लॉरेन्समध्ये फिरायला गेले होते तेव्हा काय घडले हे रियाने सांगितले आहे. रियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ते दोघेही फ्लोरेन्सला सुट्ट्या साजरा करण्यासाठी गेले होते, तेव्हा तिला समजले की सुशांतला मानसिक आजाराने ग्रासले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने सांगितले की ते ट्रिप दरम्यान 600 वर्ष जुन्या हेरिटेज हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलच्या खोल्या खूप मोठ्या होत्या आणि भिंतींवर काही जुनी पेंटिंग्ज लटकलेली होती. यातील एका चित्रात सॅटर्न आपल्या स्वत:च्या मुलाला खात आहे. रिया आपल्या भावासोबत दुसर्‍या खोलीत होती, पण जेव्हा ती परत आली तेव्हा तिने सुशांतला रुद्राक्षची माळ घेऊन काही मंत्र पठण करताना पाहिले आणि त्यावेळी ते खूपच वेगळे दिसत होते असेही तिने सांगितले.

जेव्हा रियाने त्यांना विचारले की काय घडले आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की त्या पेंटिंग्जमधील पात्रांना तो पाहू शकतो आणि ते त्याबद्दल अधिक विस्तारपणे सांगू शकले नाहीत. त्या रात्री रिया आणि तिचा भाऊ सुशांतच्या खोलीतच झोपले होते. सुशांत यांना पेंटिंग्जमुळे विचित्र गोष्टी दिसू लागल्या होत्या आणि रिया त्यांना समजावून सांगत राहिली की हा फक्त त्यांचा भ्रम आहे. यानंतर रिया आणि सुशांत शोविकसह ऑस्ट्रियामधील डिटॉक्सिफिकेशन सेंटरमध्ये गेले. पण त्यांना बरे वाटत नसल्यामुळे ते तिथूनही निघून आले.

रिया ज्या पेंटिंग्जविषयी बोलत होती ती स्पॅनिश आर्टिस्ट फ्रान्सिस्को गोया यांनी बनविली आहे. या पेंटिंग्जमध्ये असे दाखवण्यात आले आहे की सॅटर्न नावाचा एक राक्षस आपल्या नवजात मुलाला खात आहे. हे चित्र गोयाने बनवलेल्या काही 14 निवडक डार्क पेंटिंग्जपैकी एक होते. रियाच्या मते, दोघे 2 नोव्हेंबरला परत येणार होते पण 28 ऑक्टोबरला यावे लागले. रियाच्या म्हणण्यानुसार, परत आल्यावर सुशांतची उर्जा खूपच कमी दिसत होती आणि तो काही तासांपर्यंत शांत बसून राहायचा.

रियाने सांगितले की परतल्यानंतर सुशांतची तब्येत वेगाने ढासळण्यास सुरुवात झाली आणि तो बर्‍याच वेळा ओरडू लागायचा आणि रडायचा देखील. तथापि सुशांत वैद्यकीय मदत घेत होते आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार ते बायपोलर डिसऑर्डरवर उपचार घेत होते. रियाने सांगितले की ती संपूर्ण वेळ त्यांच्याबरोबर राहायची आणि 8 जून रोजी सुशांतने रियाला सांगितले की तिने परत जायला हवे. याने त्यांना ठीक होण्यास मदत होईल. यावेळी, रियाच्या मानसिक स्थितीतही फरक पडत असल्याने तिने मानसोपचार तज्ज्ञाची अपॉईंटमेंट घेतली होती.