सुशांत भरत होता 4.5 कोटींच्या फ्लॅटचे EMI ? दाव्यावर अंकिता लोखंडेनं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई : सुशांत सिंह राजपूत केसमध्ये दररोज नवनवीन अपडेट येत आहेत. नुकतेच असे वृत्त आले होते की, अ‍ॅक्ट्रेस आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ज्या घरात राहात आहे, त्याचे ईएमआय सुशांत भरत होता. आता अंकिता लोखंडेची यावर रिअ‍ॅक्शन आली आहे. अ‍ॅक्ट्रेसने इंस्टाग्रामवर आपल्या घराच्या रजिस्ट्रेशनची कॉपी आणि अकाऊंट डिटेल्स शेयर केले आहेत.

अंकिताने शेयर केल्या बँक डिटेल्स
अंकिताने घराच्या रजिस्ट्रेशनची कॉपी आणि अकाऊंट डिटेल्स शेयर करत लिहिले आहे – येथे मी सर्व शक्यता समाप्त करते. मी जेवढी ट्रान्सरंट होऊ शकते. हे माझ्या घराचे रजिस्ट्रेशन आणि माझ्या बँक खात्याचे अकाऊंट स्टेटमेंट (01/01/19 से 01/03/20 पर्यंत). जे ईएमआय चार्जेस माझ्या अकाऊंटमधून दर महिन्याला कापले जात आहेत मी ते हायलाइट केले आहेत. यापेक्षा जास्त माझ्याकडे आणखी काही बोलण्यासारखे नाही.

ईडीला तपासात समजले की, सुशांत मलाड येथील 4.5 कोटी रूपयांच्या एका फ्लॅटसाठी इंस्टॉलमेंट भरत होता. एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, बहुतेक तो फ्लॅट ज्यामध्ये अंकिता लोखंडे राहात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीने सुद्धा चौकशीदरम्यान या फ्लॅटचा उल्लेख केला होता. रियाने सांगितले होते की, सुशांतची इच्छा असूनही तो अंकिताला फ्लॅट खाली करण्यास सांगू शकत नव्हता, तो या फ्लॅटचे ईएमआय भरत होता. सुशांतच्या खात्यातून दर महिन्याला या फ्लॅटचे ईएमआईचे पैसे कापले जात होते.

दरम्यान, 15 ऑगस्टला सुशांतसाठी ग्लोबल प्रेयरचे आयोजन करण्यात आले होते. सुशांतची बहिण श्वेताने लोकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. ही ग्लोबल प्रेयर 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता झाली. जेथे सुशांतसाठी सर्वांनी मिळून मौन राहून प्रार्थना केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like