Sushant Birth Anniversary : सुशांतची Ex गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘अनसीन’ व्हिडीओ ! सोशलवर तुफान व्हायरल (Video)

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची आज (गुरुवार, दि 21 जानेवारी) 35 वी बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 मध्ये पटण्यात झाला होता. सुशांत जरी आज आपल्यात नसला तरी तो लोकांच्या मनात आजही जिवंत आहे. सुशांतचे चाहते आज अनेक पोस्ट शेअर करत त्याची आठवण काढत आहेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिनंही त्याची आठवण काढत एक अनसीन व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर अटेंशन घेताना दिसत आहे. यात सुशांत त्याचा पेट डॉग हातची (Hatchi) सोबत दिसत आहे.

अंकितानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सुशांत त्याच्या पेट डॉग सोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अंकितानंच शुट केला आहे. सुशांतचा हा अनसीन व्हिडीओ इंस्टा आणि ट्विटर असा दोन्हीकडे तिनं शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना अंकिता म्हणते, मला कळत नाहीये मी कशी सुरुवात करू. माझ्याकडे तुझ्या काही आठवणी आहेत. मी तुझी कायमच अशी आठवण काढत राहिल. आनंदी, बुद्धीमान, रोमँटीक, पागल आणि शानदार. सोबत तिनं सुशांतच्या बर्थडेचा हॅशटॅगही वापरला आहे.

पुढं अंकिता असंही म्हणाली की, मला माहित आहे तू जिथे आहेस तिथं खूप खुश आहेस. हॅप्पी बर्थडे टू यु. तू कायमच आठवत राहशील.

अंकिताचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी व्हिडीओ शेअरही केला आहे.

अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरीक्त तिनं सिनेमातही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमातही तिनं काम केलं आहे.