Video : सुशांतच्या कुटूंबानं शेअर केली त्याची व्हिडीओ क्लिप, डायलॉग ऐकून व्हाल ‘भावूक’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत जाऊन 4 महिने झाले आहेत. आजही चाहते त्याला मिस करत आहेत आणि त्याच्या काही आठवणी शेअर करत आहेत. सुशांतच्या फॅमिलीच्या युनायटेड फॉर सुशांत सिंह राजपूत या ट्विटर अकाऊंटवरून नुकताच त्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सुशांतच्या शुद्ध देशी रोमांस सिनेमातील ही एक व्हिडीओ क्लिप आहे.

सुशांतच्या फॅमिलीनं शेअर केलेल्या व्हिडीओत सुशांत म्हणत आहे की, एक गोष्ट क्लिर आहे. प्रेमात हिशोब नाही चालत फक्त राजधानी एक्सप्रेस चालते. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, त्यानं त्याचं हृदय दिलं परंतु त्याला दगा देण्यात आला.

सुशांतचा हा व्हिडीओ सोशलवर खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

युकेमध्ये कार रॅली

सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ति भावाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. युकेमधील कार रॅलीचा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं की, युकेमधील ही कार रॅली SSR वॉरियर्समध्ये एकता दाखवते. आम्हाला सीबीआयवर विश्वास आहे आणि आम्ही आपल्या तपास यंत्रणेकडून सत्य बाहेर आणण्याची वाट पहात आहोत.”