सुशांतच्या चाहत्यांना हत्येचा संशय ! सोशल मीडियावर केली जातेय CBI चौकशीची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने रविवारी 14 जून रोजी वांद्रे येथील डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या अश्या जाण्याने प्रत्येकाला धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतसारखा ‘प्रतिभाशाली’ माणूस आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकतो, यावर विश्वास ठेवण्यास चाहते तयार नाहीत. चाहत्यांना आत्महत्येपेक्षा ही मर्डर मिस्ट्री वाटत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे.

शुक्रवारी दिवसभर ट्विटरवर #CBIEnquiryForSushant ट्रेंड करत होता. सुशांतच्या आत्महत्येचे प्रकरण आधीच खूप गुंतागुंतीचे आहे. तो तणावात होता आणि गेल्या 6 महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, सुशांतला बॉलिवूडमध्ये नेपोटिज्मचा बळी पडला, असा आरोपही करण्यात आला होता. अनेक प्रमुख प्रॉडक्शन हाऊसनी सुशांतला बॅन केले होते. या प्रकरणात सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच करण जोहर आणि यशराज प्रॉडक्शनवर प्रश्नचिह्न उपस्थित होत आहेत. मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्ती, सुशांतची मॅनेजर मुकेश छाबरा आणि त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांसह इतरही अनेकांची चौकशी केली आहे. परंतु सुशांतच्या चाहत्यांनी सुशांतने आत्महत्या केली नसल्याचा संशय व्यक्त केला आहे, उलट एक विचारपूर्वक कट रचून त्याची हत्या करण्यात आली. आणि हत्येनंतर याला आत्महत्येचे रूप देण्यात आले होते. आपल्या शंका खऱ्या ठरविण्यासाठी चाहते वेगवेगळे युक्तिवादही देत आहेत.

एका थेअरीमध्ये म्हंटल्यानुसार “सुशांतची हत्या त्याचे दोन मित्र आणि घरातील नोकराने मिळून केली होती.” गेम कोडिंगमुळे सुशांतचा खून करण्यात आला असल्याचे म्हंटले गेले आहे. गेम कोडिंग हा कोट्यवधींचा खेळ आहे. ज्याला सुशांतने बनविले होते आणि आता केवळ त्याच्या मित्रांजवळच आहे. सोशल मीडियावर चाहते दावा करीत आहेत की, नोकरालाही लालच दाखवून त्यांच्या षडयंत्रात सहभागी केले गेले ” या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत चाहत्यांनीही अनेक प्रश्न विचारले आहेत.

1. जेव्हा कोणी आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या शरीरावर स्पर्श करणे कायदेशीर गुन्हा आहे. बॉडीला उतरवून कोणी आणि का केली फिंगर प्रिंटमध्ये गडबड ?

2 . लटकलेल्या प्रेताचा मुख्य फोटो का घेतला गेला नाही?

3 . खोलीत स्टूल होता का, सुशांतने स्वत: ला कसे लटकवले?

4 . गळ्यावर दोरीच्या खुणा आणि दोन्ही खांद्यावर पकडलेले ठसे ?

5 . जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः फाशी घेते, तेव्हा खूण गळ्यासपासून दोन्ही जबड्यांच्या बाजूने उमटते. पण सुशांतच्या गळ्यावर ती खूण सरळ होती, हिरव्या सिल्कच्या कुर्त्याच्या दोरीप्रमाणे वापर करत कुणीतरी मागून गळ्यात फास बनवून जोरात खेचले, ज्यामुळे घश्यावर खोल खुणा उमटल्या.

6. डाव्या डोळ्यावर निळे चिन्ह कसले आहे?

इतकेच नव्हे तर ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या काही ट्वीटवर चाहते सुशांतच्या इमारतीचे सीसीटीव्ही घटनेच्या एका रात्री आधी बंद केल्याचा आरोपही करत आहेत. तर काही जण असा दावा करीत आहेत की सुशांत त्याच्या मृत्यूच्या दोन तास आधी घराबाहेर पडला होता. तर एका ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की सुशांतच्या फ्लॅटच्या डुप्लिकेट चाव्या गहाळ आहेत. सोशल मीडियावर अश्या पोस्ट करून चाहते ही हत्या असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. जेणेकरून सत्य सर्वांसमोर येईल.