सुशांतच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी, म्हणाले – ‘माझा मुलगा धाडसी होता, तो आत्महत्या करूच शकत नाही’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात एकूण 30 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी हिची चौकशी केली आहे. अनेकांनी आजवर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता खुद्द सुशांतचे वडिल केके सिंह हे सुशांतसाठी न्याय मागत आहेत. आता केके सिंह यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

केके सिंह यांनी ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “आज माझा मुलगा सुशांतचा आत्मा रडत आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी करत आहे.”

https://twitter.com/K_KSingh_/status/1279275364720623616?s=20

‘माझा मुलगा धाडसी होता’
आणि एका ट्विटमध्ये केके सिंह यांनी लिहिलं की, “माझा मुलगा सुशांत सिंह राजपूत खूप धाडसी होता. मला माहित आहे की, तो आत्महत्या करू शकत नाही. त्याच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचं सिद्ध केलं जात आहे. वास्तविक पाहता ही एक हत्या आहे. या पूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मी विनंती करतो.” याशिवाय त्यांनी इतर अनेक ट्विट्स केले आहेत ज्यात सलमान खान, करण जोहर यांचाही उल्लेख आहे.

https://twitter.com/K_KSingh_/status/1278635794270310401?s=20

https://twitter.com/K_KSingh_/status/1279097016245555200?s=20

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता.

https://twitter.com/K_KSingh_/status/1278660574612611073?s=20

https://twitter.com/K_KSingh_/status/1278732465901694978?s=20

https://twitter.com/K_KSingh_/status/1278870307122511872?s=20

https://twitter.com/K_KSingh_/status/1279033862631206912?s=20

https://twitter.com/K_KSingh_/status/1279610056300875776?s=20