सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण ! अभिनेत्याच्या वडिलांनी रिया चक्रवतीच्या विरूध्द दिली पाटण्यात FIR, मुंबईत आता ‘अटक’सत्राची शक्यता

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचे वडिल के के सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली आहे. पाटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

केके सिंह यांनी आरोप केला आहे की, रियानं सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला सुसाईडसाठी उकसवलं आहे. आयपीसी मधील कलम 341, 342, 380, 406, 420, 306 अंतर्गत ही केस दाखल करण्यात आली आहे.

रियानं पोलिसांना दिलेल्या स्टेटमध्ये सांगितलं आहे की, ती आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. के के सिंह यांच्या या तक्रारीनंतर आता या प्रकरणाला नवीन वळण मिळताना दिसत आहे.

मुंबई पोलिसांचा तपास सुरूच

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिन्याहून जास्त काळ झाला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अद्यापही मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात जवळपास 35 पेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा, सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी, बॉलिवूड डायरेक्टर संजय लीली भन्साळी, यश राज फिल्म्स कास्टींग डायरेक्टर शानू शर्मा यांच्यासह इतरांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी रेश्मा शेट्टीचीही चौकशी केली. रेश्मा सलमानची खानची एक्स मॅनेजर राहिली आहे. नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, यासाठी आता ब्रांदा पोलिसांनी डायरेक्टर महेश भट यांना चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यांचीही चौकशी झाली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी यापुर्वी 33 हून अधिक दिग्गजांची चौकशी केली आहे. आता रिया विरूध्द फिर्याद दाखल झाल्यानंतर मुंबईमध्ये अटकसत्र सुरू होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.