सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात FIR दाखल ! कंगना राणावत म्हणाली – ‘आता संपुर्णपणे होईल तपास’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचे वडिल के. के. सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दिली आहे. पटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

केके सिंह यांनी आरोप केला आहे की, रियानं सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला सुसाईडसाठी उकसवलं आहे. आयपीसी मधील कलम 341, 342, 380, 406, 420, 306 अंतर्गत ही केस दाखल करण्यात आली आहे.

पटणा सेंट्रल झोनचे इंस्पेक्टर संजय सिंह यांनी एएनआयला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, “सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. रियाविरोधात अनेक आरोपांखाली केस दाखल करण्यात आली आहे. ज्यात सुशांतला आपल्या प्रेमात फसवून पैसे उकळणं आणि आत्महत्येसाठी उकसवणं अशा आरोपांचाही समावेश आहे.”

सुशांत आणि रिया लिव्ह इनमध्ये राहत होते हे सर्वांनाच माहिती आहे. बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिनंही एक पत्रकाराचं ट्विट रिट्विट करत तिच्या भावना मांडल्या आहेत. कंगना म्हणते, “रिया गेल्या 6 महिन्यांपासून सुशांतच्या सोबत होती. तिनं सुशांतच्य रहस्यमयी मृत्यूच्या केवळ 2 दिवस आधीच महेश भट यांना मानसशास्त्रज्ञ म्हणून हायर केलं होतं. आनंद आहे की, आता या पूर्ण प्रकरणाचा तपास केला जाईल.”

कंगना राणावत गेल्या अनेक दिवसांपासून यावर भाष्य करत आहे आणि बिंधास्त आपलं मत सोशलवरून मांडत आहे.