सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सोशल मीडियात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांना ट्रोल केलं गेलं. त्यामध्ये बडे दिग्दर्शक, निर्माते, स्टार किड्स यांना नेपोटिझम वरुन अनेकांना टीका सहन करावी लागली. त्यानंतर सुशांतची सर्वात जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला सुद्धा सुशांतच्या आत्महत्येवरुन ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले होते. मात्र, या ट्रोलिंगला अद्याप तरी पूर्णविराम लागू शकलेला नाही. रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर सुशांतसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. आतापर्यंत दोघे कधीही आपल्या नात्याबद्दल व्यक्त झाले नव्हते, पण त्यांच्यातील जवळीकता या फोटोमधून दिसत आहे.

सुशांतसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अनेकांनी खंबीर राहण्याबाबत सल्ला दिला. तिच्या दुःखात सहभागी असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, त्यापेक्षा जास्त अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. तसेच रियाच्या या पोस्टवरती अवघ्या बॉलिवूडकरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच दुःख त्यांनी कमेंट्सच्या स्वरुपात वाटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी रियाला खोटारडी ठरवले आहे. तिच्या या पोस्टवर काही अभद्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये रिया आणि सुशांतच्या अफेरबाबत चर्चा होती. पण त्यांनी कधी आपल्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं नव्हते. सुशांत आणि रिया काही काळासाठी एकत्र राहत होते. दरम्यान, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी रियाची चौकशी मुंबई पोलिसांनी केली होती. त्यात सुशांतच्या आत्महत्येपूर्वीच तिने त्याचे घर सोडल्याची माहिती समोर आली आहे.