सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून अभिनय सोडण्याची तयारी केली होती ‘या’ TV अभिनेत्यानं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 14 जुनला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी ऐकून त्याचे चाहतेच नाही तर बॉलिवूड मधील सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सुशांतने सिनेमामधेच नाही तर टिव्ही इंडस्ट्रीमध्येही काम केले होते. सुशांत प्रकारणाचा गुंता आजतागायत सुटला नाही. अनेकजण त्याच्या जाण्याच्या धक्यातुन अजूनही सावरले नाहीत. अभिनेता अंगद हसीजाने अभिनय सोडण्याचा विचार केला होता.

अंगद मीडियाशी बोलताना म्हणाला की, सुशांतचा टीव्ही ते बॉलिवूड हा प्रवास खूप प्रेरणादायी होता. खूप कमी दिवसात तो अधिक फेमस झाला होता, सगळीकडे त्याची चर्चा चालू होती. जेव्हा तो गेल्याचं समजलं तेव्हा टीव्ही इंडस्ट्री सोडण्याचा विचार माझ्या मनात आला होता.

एकाच जिम मध्ये जात होते अंगद आणि सुशांत

अंगद हसीजाला जेव्हा समजलं की सुशांत डिप्रेशन मध्ये आहे, आणि तो उपचार घेत आहे तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं होतं. तो म्हणाला की मला त्यावर विश्वासच बसत नव्हता. मला खूप काळजी वाटत होती, यातून सावरायला मला खूप वेळ लागला होता.

त्याच्या करियर बद्दल बोलताना तो म्हणाला, जेव्हा मी कधी हताश किंवा निराश होतो तेव्हा मी माझ्या कुटुंबियांसोबत राहतो. आपण जे काम करतो त्याला जोडून आपल्याकडे दुसरा एखादा पर्याय देखील असायला हवा. जर मी माझं हे करियर सोडलं तर माझ्याकडे फॅमिली बिझनेस आहे.

तो पुढे म्हणाला लोक सुशांतच्या नावाचा उपयोग स्वतःच्या फायदयासाठी करून घेत आहेत. त्यामुळे मी आजपर्यंत शांत राहिलो. सुशांतची आणि माझी ‘जरा नचके दिखा’ रिऍलिटी शो च्या दरम्यान मैत्री झाली होती. आमची अवोर्ड्स शोमध्ये भेट होत होती.

तो म्हणाला, मी आणि सुशांत एकाच जिम मध्ये होतो. भले ते दोघे कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते पण जेव्हा भेटत होते तेव्हा मात्र बोलणं होत असायचं.