जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला- ‘डिसेंबरमध्ये सुशांत घ्यायचा संशयास्पद औषधं !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून अनेक मोठे खुलासे होताना दिसत आहेत. आता सुशांतच्या जीम ट्रेनरनं धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांत डिसेंबरमध्ये अशी काही औषध घेत होता जी त्यानं आधी कधीही घेतली नव्हती अशी माहिती ट्रेनरनं दिली आहे.

सुशांतचा ट्रेनर सामी अहमद यानं एका मीडिया हाऊस सोबत बोलताना सांगितलं की, सुशांत सिंह राजपूत डिसेंबर 2019 पासून काही संशयास्पद औषधं घेत होता. याचा त्याच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत होता.

पुढे बोलताना अहमदनं सांगितलं की, सुशांतनं अशी औषधं आधी कधीही घेतली नव्हती. या औषधांचं सेवन केल्यानंतर त्याचे हातपाय कापत असत. बऱ्याचदा तो अस्वस्थ राहू लागला होता. त्यानं एक दोन महिन्यांसाठी या औषधांचा कोर्स करत असल्याचं सांगितलं होतं. मी त्याला यासाठी मनाई केल्यानंतर तो म्हणाला होता की, एकदा कोर्स सुरू केल्यानंतर असा मध्येच सोडू शकत नाही.

अहमद असंही म्हणाला की, नैराश्येसोबतच त्याला डेंग्यू झाला होता. नोव्हेंबरमध्ये सुशांतनं मला सांगितलं होतं की, पॅरीसवरून परतल्यानंतर त्याला डेंग्यू झाला आहे. त्यांचं डॉक्टरांकडून काऊंसिलिंगही सुरू होतं. सुशांतचं वागणं खूप बदललं होतं. साधा व्हायरल ताप आला तरी तो कधी औषधं घेत नव्हता. परंतु या औषधांमुळं त्याला नीट वर्कआऊटदेखील करता येत नव्हतं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like