SSR Death Case : सुशांत सिंहला होता बायपोलर डिसऑर्डरचा त्रास, डॉक्टरांनी मुंबई पोलिसांना सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   सुशांत सिंह राजपूत केसमध्ये प्रत्येक दिवशी नवीन खुलासा होत आहे. या केसमध्ये सीबीआयशिवाय ईडी, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची टीम तपास करत आहे. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी मुंबई पोलिसांच्या चौकशीत खुलासा केला होता की, सुशांतला बायपोलर डिसऑर्डर होता. त्यांच्यानुसार सुशांत मागील 13 वर्षांपासून अटेंशन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डरला तोंड देत होता. डॉक्टरांचे म्हणणे होते की, याशिवाय त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू होते आणि तो औषधे घेत होता. मुंबई पोलिसांना दिलेल्या एका जबाबात सुशांतच्या बहिणीने म्हटले होते की, 2013 मध्ये सुशांतची तब्येत जास्त खराब झाली होती.

काय आहे बायपोलर डिसऑर्डर?

बायपोलर डिसऑर्डर एक असा आजार आहे, ज्यामध्ये रूग्णाचे मन सतत बदलत राहाते. बायपोलर डिसऑर्डरमध्ये रूग्ण कधी खुप जास्त खुश होतो, तर कधी खुप दुखी होतो. हा आजार वाढल्यानंतर रूग्ण आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो. बायपोलर डिसऑर्डर डिप्रेशनची हाय लेव्हल आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. बायपोलर डिसऑर्डर होण्यापूर्वी रूग्ण डिप्रेशनने ग्रस्त झालेला असतो. डिप्रेशनचे उपचार न झाल्याने रूग्ण बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त होतो.

ड्रग्स घेत होता सुशांत!

मागील काही दिवसापूर्वी सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीच्या वकिलांनी सांगितले होते की, त्याच्या कुटुंबियांना माहित होते की त्याला ड्रग्जचे व्यसन आहे. घरी ज्या पार्ट्या होत असत त्यामध्ये त्याची बहिणसुद्धा सहभागी होत असे. सुशांतची एक बहिण मुंबईत राहात आहे. विशेष म्हणजे वकिलाने पार्टीत सहभागी होणार्‍या सुशांतच्या बहिणीचे नाव सांगितले नाही. रिया चक्रवर्तीसोबत रिलेशन सुरू झाल्यानंतर सुशांत ड्रग्ज घेऊ लागला होता.