सुशांत सिंगला ड्रग्ज पुरवणारा हरीश खान NCB च्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग (Sushant Singh) राजपूत प्रकरणी तपास करणा-या NCB च्या जाळ्यात सुशांतपर्यंत ड्रग्ज पोहचवणारा ड्रग पेडलर अडकला आहे. हरीश खान असे त्याचे नाव असून एनसीबीने त्याला वांंद्रे येथून अटक केली आहे. सुशांतसिंगचा (Sushant Singh) रुम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानीला NCB ने नुकतेच हैदराबादमधून अटक केली होती.

कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी बँकेत पैसे गुंतवा, आगामी 6 महिन्यात मिळतील 60 टक्क्यांहून जास्त रिटर्न, जाणून घ्या

तसेच सुशांतचे नोकर असलेले नीरज केशव यांची देखील एनसीबीने कसून चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान हरीश खानचे नाव समोर आले होते. हरीश हा ड्रग पेडलर असून तो सुशांतपर्यंत ड्रग्ज पोहचवत असे. हरीश त्याच्या भाऊ शकीब खानसोबत वांद्रे परिसरात ड्रग्सची विक्री करत होता. हरीश परिसरातील छोट्या ड्रग पेडलरच अपहरण करून त्यांच्याकडे असलेले ड्रग्स जप्त करत त्याला आपल्या टोळीत काम करण्यास भाग पाडत असत. हरीश खान कधी बंदूक घेऊन तर कधी जिवंत साप घेऊन फिरून लोकांत आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.

HSC Bord Exam : बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाचं झालं एकमत

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

 

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

 

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

 

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !