‘माझ्याही मनात आत्महत्या करण्याचा विचार होता परंतु…’, काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा मोठा ‘गौप्यस्फोट’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्या पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट समोर आल्यानंतर असं सांगितलं जात आहे की, गळफास घेतल्यानंतर श्वास थांबल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर सुशांतच्या जवळच्या मित्रांनीही असं सांगितलं आहे की, गेल्या 6 महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता.

सुशांतला श्रद्धांजली वाहताना काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही मोठा खुलासा केला आहे. खासदार असताना त्यांच्याही मनात आत्महत्येचा विचार आला होता असं त्यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं की, “माझ्या मनातही आत्महत्येचा विचार आला होता, तेही एकदा नाही तर दोनदा. पहिल्यांदा लहान असताना आणि दुसऱ्यांदा मी खासदार असताना. परंतु नंतर मात्र मी दु:खासोबत जगणं शिकून घेतलं.” असं ते म्हणाले. इतकंच नाही तर देवरा यांनी त्यांच्या अनुभवातून असे 5 उपाय सुचवले आहेत ज्यामुळं आपण काही समस्या असेल तर त्यातून बाहेर येऊ शकतो. ते उपाय पुढीलप्रमाणे –

1) ज्या लोकांना आपण हवे आहोत अशा लोकांना आपण भेटायला हवं. जसं की, मित्र कुटुंबीय, सहकारी आदी.
2) मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन करण्यास संकोच बाळगू नका.
3) आपल्यचा आत असणाऱ्या सैतानाशी लढताना हार मानू नका.
4)कसल्याही शर्यतीत अडकू नका. तुम्हाला आनंद देणारी गोष्ट करा.
5) स्वत:वर प्रेम करा. आयुष्य खूप सुंदर आहे.