सुशांतच्या निधनानंतर ‘मेमोरलाईज्ड’ करण्यात आलं त्याचं Instagram अकाऊंट ! जाणून घ्या अर्थ
पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. मुंबई पोलीस सध्या सुशांतच्या केसचा तपास करत आहेत. त्यांनी याप्रकरणी आतापर्यंत 15 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
मेमोरलाईज्ड करण्यात आलं सुशातंचं Instagram Account
सुशांतचं निधन होऊन 8 दिवस होत आले तरीही सोशल मीडियावर सतत त्याचीच चर्चा होताना दिसत आहे. त्याचे सोशलवरील फॉलोवर्सही वाढत आहेत. सुशांतनं जेव्हा सुसाईड केलं तेव्हा त्याचे 9 मिलियन म्हणजेच 90 लाख फॉलोवर्स होते. परंतु यानंतर अवघ्या 5 दिवसात त्याचे फॉलोवर्स 12.7 मिलियन झाले आहेत म्हणजेच 1 कोटी 27 लाख इतके झाले आहेत. आता सुशांत सिंहचं इंस्टा अकाऊंट मेमोरलाईज्ड करण्यात आलं आहे. त्याच्या इंस्टा अकाऊंटवर Remembering असं लिहिलेलं दिसत आहे.
#SushantSingRajput's #Instagram account memorized after his death#SushantSingh pic.twitter.com/ADBwvHpgWa
— TimePass (@TimePassTalks) June 20, 2020
मेमोरलाईज्ड म्हणजे काय ?
मेमोरलाईज्ड अकाऊंट त्या व्यक्तीचं अकाऊंट असतं ज्याचं निधन झालं आहे आणि हे अकाऊंट त्याची आठवण म्हणून अॅक्टीव ठेवलं जातं. हे अकाऊंट इतरांपासून यासाठी वेगळं असतं कारण याला कोणीच लॉग करू शकत नसतं. या अकाऊंटवरून त्या व्यक्तीनं निधनाच्या आधी शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ तसेच राहतात. प्रत्येकजण ते पाहू शकतात. मेमोरलाईज्ड अकाऊंट Explore मध्ये दिसत नाही.
— TimePass (@TimePassTalks) June 20, 2020