‘या’ दिवशी रिलीज होणार सुशांतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’, Free मध्ये पाहू शकतील चाहते !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नाही. लकरच सुशांतचा शेवटचा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दिल बेचारा असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातील लिड अॅक्ट्रेस संजना संघी हिनं सोशल मीडिायवर पोस्टर शेअर करत सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल माहिती दिली आहे.

मुकेश छाबडा डायरेक्टेड दिल बेचारा हा सिनेमा 24 जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. खास बात अशी की, प्लॅटफॉर्मचे सब्सक्रायबर्स आणि नॉन सब्सक्रायबर्स असे सारेच हा सिनेमा पाहू शकणार आहेत.

संजनानं ट्विटरवरून पोस्टर शेअर केली आहे. संजनानं लिहिलं की, “प्रेम, आशा, आणि कधीही न संपणाऱ्या आठवणींची कहाणी. सुशांत सिंह राजपूतचा वारसा जो कायम सर्वांच्या मनात राहिल आणि सन्मानित राहिल. दिल बेचारा 24 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता.