सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचा ट्रेलर आज येणार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या सिनेमाचा ट्रेलर आज येणार आहे. त्याच्या जाण्याचे दु:ख तर आहेच, पण त्याने त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून अनेक आठवणींचा ठेवा तो मागे ठेवून गेला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचा शेवटचा सिनेमा ’दिल बेचारा’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुशांतच्या चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्मात्यांनी अशी घोषणा केली होती की, या चित्रपटाचा ट्रेलर 06 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आज सकाळपासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाची त्याचे चाहते वाट पाहत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचे हॅशटॅग ट्रेंड देखील करत आहेत. दरम्यान या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूतबरोबर संजना सांघीहा नवा चेहरा दिसणार आहे. सुशांतच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच इतकी क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान काहींनी या चित्रपटाच्या ट्रेलरला 100 मिलियन मिळवून देण्याबाबत देखील भाष्य केले आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर करण्याचा सुशांतच्या चाहत्यांचा मानस आहे. त्याचप्रमाणे सुशांतचा ’दिल बेचारा’ रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like