अफेअरची चर्चा असतानाच सुशांत आणि रिया चक्रवर्ती रात्री उशीरा रस्त्यावर मस्ती करताना ‘स्पॉट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूत पुन्हा एकदा अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. असे वृत्त समोर येत आहेत की, रिया चक्रवर्तीसोबत सुशांत सिंह नात्यात आहे. तसे पाहिले तर दोघांनी आपल्या नात्याबद्दल अद्याप कोणताही घोषणा केलेली नाही. सुशांत आणि रिया बांद्रा नाईट आऊट करताना स्पॉट झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.

यावेळी सुशांत कॅज्युअल ब्लॅक टीशर्ट आणि व्हाईट स्निकर्समध्ये दिसला. तर रियानेही त्याला मॅचिंग असा आऊटफिट केला होता. ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये रिया खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती. दोघांमधील स्पेशल बाँडिंग फोटोतही दिसत आहे.

image.png

रात्री उशीरा रिया आणि सुशांत मुंबईच्या रस्त्यांवर मस्ती करताना दिसत आहे. दोन्हीही स्टार्सचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांनाही सुशांत आणि रियाचे हे स्पेशल बाँडिंगवाले फोटो खूपच आवडले आहेत. सुशांत आणि रिया नेहमीच एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसून येतात. सुशांत आणि रियाचे याआधीही अनेक फोटो समोर आले आहेत जे व्हायरल झाले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सुशांत लवकरच आपला आगामी सिनेमा ‘छिछोरे’ मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा ३० ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर लिड रोलमध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘ड्राईव’ या सिनेमातही सुशांत झळकणार आहे. रियाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच रिया नेटफ्लिक्सवरील वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like