सुशांत सिंह राजपूतचा फनी व्हिडीओ सोशलवर व्हायरल, ‘अशा’ केल्या देवानंदच्या फेमस डान्स स्टेप्स (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. चाहते आणि सेलेब्स अजूनही सुशांतची आठवण काढत आहेत. सध्या सुशांतचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुशांतचा एक फनी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेकअप रुममध्ये बसलेला सुशांत फनी अॅक्टींग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सुशांतच्या छिछोरे या शेवटच्या सिनेमातील आहे. यात सुशांत दोन वेगळ्या लुकमध्ये आहे. एक कॉलेज स्टुडेंडचा आणि दुसरा वडिलांचा लुक आहे ज्याच्या डोक्यावर खूपच कमी केस आहेत.

व्हिडीओत दिसत आहे की, मेकअप आर्टीस्ट त्याच्या डोक्यावर विग लावण्यासाठी चिकट असं लिक्वीड लावत आहे. याचवेळी सुशांत हमने बहुत तुझको छुप छुप के देखा या गाण्यावर देवानंद यांच्या फेमस स्टेप्स फनी अंदाजात करताना दिसत आहे. देवानंदच्या पॉप्युलर डान्स स्टेप्स तो करत आहे ज्या देवानंदनं जॉनी मेरा नाम सिनेमात केल्या होत्या. सुशांतचा टक्कलही खूप कॉमेडी वाटत आहे.