सुशांतनं आत्महत्येच्या 3 दिवसापुर्वी दिली होती हाऊस स्टाफची ‘सॅलरी’, म्हणाला – ‘पुढं हे देखील नाही देऊ शकणार, म्हणून सध्या ठेवा’ !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर मुंबई पोलीस त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका सोर्सचं म्हणणं आहे की, सुशांतनं आत्महत्येच्या 3 दिवसआधी सर्वांना सॅलरी दिली होती. सुशांत असंही म्हणाला होता की, तो पुढील सॅलरी देऊ शकणार नाही.

एका इंग्रजी वृत्तानुसार पोलिसांच्या चौकशीत सुशांतच्या हाऊस हेल्पनं चकित करणारे खुलासे केले आहेत. सुशांत गेल्या 10 दिवसांपासून खूप अपसेट होता. गेल्या 3 दिवसांपासून तो अजिबात ठिक नव्हता. ते कोणाशी बोलतही नव्हता अशी माहिती आहे.

एका रिपोर्टमध्ये असाही उल्लेख आहे की, सुशांतचा हाऊस हेल्प म्हणाला की, सुशांत यांनी आम्हाला सांगितलं होतं की, त्यांनी सर्व उधारी मिटवली आहे. परंतु ते आता आमची सॅलरी देऊ शकतील की नाही हे मात्र सांगू शकत नाही.

सुशांतच्या निधनानंतर सोशलवर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. त्याला श्रद्धांजली दिली जात आहे. त्याला घेऊन अनेक हॅशटॅग चालवले जात आहेत. नपोटीजम आणि बॉलिवूडधील पॉलिटीक्स यावरूनही वाद सुरू आहे. सुशांतचे अनेक जुने व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.