हात जोडून सुशांतच्या बहिणीनं केलं ‘आवाहन’, म्हणाली – ‘आम्हाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार, CBI चौकशी व्हायला हवी’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला 2 महिने होणार आहेत. परंतु अभिनेत्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या खटल्याच्या चौकशीबाबतही राजकारण पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सुशांतला न्याय मिळावा याबाबची मागणी सातत्याने वाढत आहे. आता सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती यांनी आपल्या भावाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सुशांतच्या बहिणीने सीबीआय चौकशीची मागणी केली

श्वेताने ट्विटरवर आपला एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्यांनी एक बोर्ड धरलेला आहे. त्यात लिहिले आहे- मी सुशांत सिंह राजपूतची बहीण आहे. मी सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आवाहन करत आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, सत्य शोधण्याची वेळ आली आहे जेणेकरुन आम्हाला न्याय मिळेल. कृपया आमच्या कुटुंबास आणि संपूर्ण जगाला सत्य काय आहे हे जाणून घेण्यास मदत करा. जेणेकरून एखाद्या निष्कर्षावर पोहोचता येईल. अन्यथा आम्ही कधीही शांततापूर्ण जीवन जगू शकणार नाहीत. सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी आवाज उठवा.

अंकिता लोखंडे यांनीही सुशांतच्या बहिणीच्या पोस्टवर कमेंट केली. त्यांनी लिहिले- आम्हाला सत्य सापडेल आणि आम्हाला न्याय मिळेल. तसेच सुशांतची बहीण श्वेताने सीबीआय चौकशीची मागणी करणारा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्या म्हणाल्या की त्यांना या प्रकरणात निष्पक्ष चौकशी हवी आहे जेणेकरून सत्य समोर येईल. दरम्यान आज सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. त्यामुळे हे स्पष्ट होईल की या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करेल किंवा सीबीआय करेल. प्रत्येकजण आतुरतेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

 

 

 

बुधवारी सुशांत सिंह राजपूत यांच्या डायरीची काही पाने त्यांच्या कुटुंबियांनी जाहीर केली होती. ज्याने सुशांतच्या 2020 च्या योजनांविषयी खुलासा झाला. सुशांतच्या डायरीच्या या पृष्ठांवर भाष्य करताना त्यांची बहीण श्वेताने लिहिले- कोणी असा व्यक्ती ज्याच्या भविष्याबाबत योजना आधीपासून तयार आहेत. स्वप्नांना वास्तवात कसे रुपांतर करावे हे त्याला माहित आहे. जो सकारात्मकतेने परिपूर्ण आहे. माझ्या भावा, मी तुला सलाम करते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like