सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याच्या घटनेला जवळपास एक महिना झाला आहे. तरीदेखील सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली असावी? हे अद्याप समोर आलेले नाही. आतापर्यंत सुमारे तीस पेक्षा अधिकांची चौकशी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यावर आहेत, असे समजत आहेत. याबाबत ‘झी न्यूज हिंदी’च्या रिपोर्ट्सनुसार, शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक टीमची भेट घेतली आहे.

येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये फॉरेन्सिक विभागाचा अहवाल मुंबई पोलिसांना मिळणार आहे. याप्रकरणी गरज भासल्यास आणखी काहींचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीतून नवीन माहिती समोर आलेली नाही. तरीही आता अखेरच्या रिपोर्टकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता सलमान खानकडे एकेकाळी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या रेश्मा शेट्टीची देखील पाच तास चौकशी केली आहे. सलमान खानकडे काम करणे बंद केल्यानंतर रेश्माने तिची स्वत:ची कंपनीही सुरु केली होती. आपण सुशांतला आतापर्यंत केवळ दोन वेळाच भेटल्याची माहिती तिने चौकशीदरम्यान दिली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून रोजी वांद्रेतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतने नैराश्यमुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र, अनेकांनी सुशांची आत्म्यहत्या नसून हत्या आहे, असे सोशल मीडियावर अनेकजण सांगत आहेत. तर बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याला टोकाचे पाऊल उचलायला भाग पडल्याचे बोलले जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like