सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा यांचा समावेश आहे. नुकताच सुशांतचा फायनल पोस्ट मॉर्टेम रिपोर्टही आलाय ज्यात त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. परंतु पोलीस तपास करत असताना आता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतनं ज्या खोलीत आत्महत्या केली होती तिथं जमिनीवर बाथरोबचे काही तुकडे मिळाले आहेत. पोलिसांना असा संशय हे की, सुशांतनं आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला जो यशस्वी झाला नाही. पोलिसांना असा संशय आहे की, सुशांतनं आधी बाथरूममधील त्याच्या बाथरोबचा वापर गळफास घेण्यासाठी केला होता पंरतु तो फास तुटला. अशा प्रकारे सुशांत आत्महत्येसाठी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकला नाही असा पोलिसांना संशय आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वॉर्डरोबमधील कपडेही विखुरलेले होते. पोलिसांचा असा संशय आहे की, बाथरोब तुटल्यानंतर सुशांतनं त्याचा वॉर्डरोब चेक केला आणि त्यातून हिरवा कुर्ता काढला ज्या फास बनवून त्यानं आत्महत्या केली. सूत्रांच्या मते जेव्हा पोलीस सुशांतच्या घरी पोहोचले त्याआधीच सुशांतची बहिण आणि खोलीत उपस्थित लोकांनी तो हिरवा कुर्ता कापून सुशांतची बॉडी खाली उतरवली होती. पोलिसांनी हा हिरवा कुर्ता सध्या फॉरेसिंक लॅबमध्ये पाठवला आहे. जेणेकरून याची माहिती मिळावी की, हा कुर्ता एका माणसाचं वजन उचलण्यास सक्षम आहे किंवा नाही.