रिया चक्रवर्तीच्या मोबाईलनं केली दाव्याची ‘पोलखोल’, ड्रग्स घेण्यासह खरेदी-विक्रीमध्ये देखील सहभागी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिया चक्रवर्ती सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अडकलेली दिसत आहे. या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून रियाचा भाऊ शोविक याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. यानंतर रिया चक्रवर्तीसुद्धा तिच्याच जाळ्यात अडकताना दिसत आहे. आता तपासणी दरम्यान त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुनच पोल उघडकीस येत आहे.

केंद्रीय इनवेस्टिगेशन एजेंसीजने पीएमएलएच्या तरतुदीनुसार, केलेल्या तपासणीत असे आढळले आहे की, रिया चक्रवर्तीचे इनवॉल्वमेंट ड्रग्ज खरेदी, विक्री आणि वापरात होते. रियाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती दरम्यान या गोष्टीला पूर्णपणे नकार दिला होता आणि असे म्हटले होते की, ड्रग्सशी तिचा काही संबंध नाही. तसेच अभिनेत्रीने कधीही ड्रग्ज घेतलेले नाहीत.

रियाच स्वतः आपल्या जाळ्यात अडकली
रिया चक्रवर्ती हीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून असे उघड झाले आहे की, तिने नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट, (एनडीपीएस) 1985 अंतर्गत येणारे कॉन्ट्राबॅंड्स प्रोडक्ट्स खरेदी केले, विकले आणि त्याचा वापर केला आहे. आता येत्या काळात रिया चक्रवर्ती हीच्या अडचणी आणखी वाढू शकतात. या प्रकरणाच्या सुरूवातीपासूनच रिया ही संशयाखाली होती. अशा परिस्थितीत, तिच्या शब्दांमध्ये आणि कृतीत समानतेचा अभाव ही तिच्यासाठी आगामी काळात मोठी समस्या बनू शकते. सुशांत सुसाइड प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यापासून या प्रकरणात जोरदार चर्चा झाली आहे.