‘कोट्यावधी रुपयांवर होती रियाची नजर, घेऊन गेली सर्व मौल्यवान वस्तू अन् कागदपत्रे’, सुशांतच्या वडिलांनी सांगितलं

पोलीसनामा टीम –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचे वडिल के के सिंह यांनी अभिनेत्याच्या आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर देत गंभीर आरोप केले आहेत. पटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यांनी अनेक चकित करणारी विधान केली आहेत.

केके सिंह यांनी आरोप केला आहे की, रियानं सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला सुसाईडसाठी उकसवलं आहे. आयपीसी मधील कलम 341, 342, 380, 406, 420, 306 अंतर्गत ही केस दाखल करण्यात आली आहे.

के के सिंह यांनी मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असं सांगत पटणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी FIR मध्ये अनेक सवाल केले आहेत जे विचार करण्यास भाग पाडत आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, रियाला भेटण्याआधी सुशांत मानसिकरित्या पूर्णपणे ठिक होता. असं काय झालं की, तिच्या संपर्कात आल्यानंतरच तो मानसिकरित्या डिस्टर्ब झाला?

सुशांतच्या वडिलांनी असंही म्हटलं आहे की, रियानंच सुशांतवर मोबाईल नंबर बदलण्यासाठी दबाव टाकला होता, जेणेकरून तो जवळच्या लोकांसोबत बोलू शकणार नाही. इतकंच नाही तर रियानं त्याच्या जवळचा स्टाफही बदलला होता जो त्याच्यासाठी काम करत होता.

FIR नुसार, रियानं सुशांतसमोर अशी अट ठेवली होती की, त्यानं फक्त तेच प्रोजेक्ट करावेत ज्यात रिया त्याच्यासोबत असेल. याशिवाय सुशांतनं कमावलेल्या कोट्यावधी रुपयांवरही तिची नजर होती.

सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझा मुलगा सुशांत फिल्म लाईन सोडून केरळमध्ये ऑर्गेनिक शेती करणार होता. त्याचा मित्र महेश त्याच्यासोबत कुर्ग या ठिकाणी जाण्यासाठी तयार होता. परंतु तू कुठेही जाणार नाही असं म्हणत रियानं याला विरोध केला.

त्यांनी सांगितलं की, रिया सुशांतला म्हणाली होती की, जर तू माझं ऐकलं नाही तर मी मीडियात तुझे मेडिकल रिपोर्ट देईन. सर्वांना सांगेन की, तू वेडा आहेस.

जेव्हा रियाला वाटलं की, सुशांत तिचं काही ऐकत नाहीये आणि त्याचा बँक बॅलन्सही कमी झाला आहे तर रियानं विचार केला की, सुशांत आता तिच्या काहीच कामाचा नाहीये. यानंतर त्याच्यासोबत राहणारी रिया दिनांक 8-6-20 रोजी सुशांतच्या घरातून खूप सामान, कॅश, दागिने, लॅपटॉप, पासवर्ड, क्रेडिट कार्ड, त्याचे पिन नंबर्स ज्यात सुशांतची महत्त्वाची कागदपत्रे, उपाचाराचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन निघून गेली.

सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, रियानं सुशांतचं घर सोडल्यानंतर सुशांतचा फोन नंबर ब्लॉक केला. यानंतर सुशांतनं माझ्या मुलीला फोन केला. सुशांतनं सांगितलं की, रिया मला कुठेतरी फसवेल. ती इथून खूप सारं सामान घेऊन गेली आहे. मला धमकी देऊन गेली आहे की, जर तू माझं ऐकलं नाहीस तर उपाचाराची सर्व कागदपत्रे मी मीडियात देईन.

सुशांतच्या वडिलांनी आरोप केला आहे की, जर त्यांच्या मुलाची मानसिक स्थिती ठिक नव्हती तर त्यांच्या कुटुंबीयांना याची सूचना का नाही दिली गेली? वास्तविक पाहता याची पहिली सूचना कुटुंबीयांना द्यायला हवी होती.