SSR Death Case : रियाच्या अर्जावर ‘सुप्रीम’ निर्णय आज, केस मुंबईला ‘ट्रान्सफर’ होणार की CBI तपास करणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालय बुधवारी देणार आहे. सर्वोच्च न्यायालय ठरवणार की, सुशांत प्रकरणाची चौकशी CBI करणार की मुंबई पोलीस करणार. बिहार सरकारने पटना मध्ये दाखल केलेला एफआयआर सीबीआय च्या ताब्यात दिला आहे. तिकडे महाराष्ट्र सरकार सीबीआय कडे हे प्रकरण देण्याला विरोध करत आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी आता कोण करणार?

महाराष्ट्र सरकारचे असे मत आहे की या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडे देण्यात यावी. ज्यांनी आत्तापर्यंत प्रकरणाशी संबंधित 56 लोकांची चौकशी केली आहे. मुंबई पोलीस म्हणत आहे की, ही घटना मुंबई मध्ये घडली आहे त्यामुळे याची चौकशीही मुंबई पोलिसांकडेच देण्यात यावी. सुशांतच्या वडिलांनी पटनामध्ये रिया विरुद्ध गुन्हा नोंदवला होता. दुसरीकडे रियाने सांगितले की या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी. त्यामुळे पटनातील एफआयआर मुंबईला ट्रान्सफर करण्यात यावा अशीही मागणी तिने केली आहे.

मुंबई पोलीस की सीबीआय

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालय बुधवारी देणार आहे. सर्वोच्च न्यायालय ठरवणार की, सुशांत प्रकरणाची चौकशी CBI करणार की मुंबई पोलीस करणार? म्हणजे उद्याचा दिवस या प्रकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर उद्या सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने चौकशी करावी असा निर्णय दिला तर या प्रकरणाचे अनेक कंगोरे उलगडण्याची शक्यता आहे.

बिहार पोलिसांनी पटनामध्ये दाखल केला होता एफआयआर

सीबीआय कडे सर्वोच्च न्यायालय जेव्हा हे प्रकरण सोपवेल तेव्हा एका आठवड्याच्या आत महत्वपूर्ण चौकशीकरण्यात येणार आहे. बिहार सरकारने मात्र हे प्रकरण याआधीच सीबीआयकडे सोपवलं आहे. आणि महाराष्ट्र राज्य सरकार याला विरोध करत आहे.

महाराष्ट्र सरकारचे असे मत आहे की या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडे देण्यात यावी. ज्यांनी आत्तापर्यंत प्रकरणाशी संबंधित 56 लोकांची चौकशी केली आहे. मुंबई पोलीस म्हणत आहे की, ही घटना मुंबई मध्ये घडली आहे त्यामुळे याची चौकशीही मुंबई पोलिसांकडेच देण्यात यावी. कारण यातील पीडित, आरोपी हे मुंबईचे आहेत.

सुशांतच्या वडिलांनी पटना मध्ये रिया विरुद्ध गुन्हा नोंदवला होता.पण आता सीबीआयकडे प्रकरण देण्याची मागणी ते करत आहेत. तर रियाने सांगितले की ही केस सीबीआयकडे देण्यावर तिचा कोणताच आक्षेप नाही.