सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी समजल्यावर अशी झाली होती MS धोनीची अवस्था

पोलीसनामा ऑनलाइन  – अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे समजताच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हादरला असल्याची माहिती मिळाली आहे. भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बायोपीकमध्ये सुशांतनं धोनीची भुमिका साकारली होती.

धोनीच्या बायोपीकमध्ये काम करण्यासाठी सुशांतने विशेष मेहनत घेतली होती.  धोनीच्या बॅटिंग स्टाइलपासून ते त्याच्या शॉटचाही अभ्यास त्याने केला होता. याच दरम्यान धोनी आणि सुशांत यांच्या चांगले संबंध होते. धोनीला सुशांतच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्याला या गोष्टीवर विश्वासही बसला नाही. धोनी दोन दिवस धक्क्यात असल्याची माहिती त्याच्या मित्राांनी दिली.

याबद्दल बोलताना नीरज पांडे म्हणाले की, धोनीला सांगण्याआधी त्यांनी मिहिर दिवाकर आणि अरुण पांडे या दोन जवळच्या मित्रांना फोन केला. नीरजने सांगितले की त्याने धोनीला ही बातमी कळताच तो शॉक झाला. हादरून गेला. बायोपिकसाठी परिश्रम व सुशांतचा अभिनय धोनी त्याचा फॅन झाला होता. इतकेच नव्हे तर सुशांतने त्याच्या फलंदाजीनेही धोनीला प्रभावित केले.

विशेषत: धोनीला सुशांतचती हेलिकॉप्टर शॉट खेळण्याची पद्धत आवडली. सुशांतला क्रिकेटचे खास आकर्षण होते, कारण त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते. तो राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रिकेट खेळला, पण नंतर कुटुंबाच्या अपेक्षेनुसार इंजिनिअरिंग केले. सुशांतच्या फलंदाजीचे कौतुक सचिन तेंडुलकरनेही केले होते. सुशांतनं किरण मोरे यांच्याकडून धोनीच्या बायोपीकसाठी प्रशिक्षण घेतले होते.