सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येचा तपास ‘सीबीआय’कडे देण्यास महाराष्ट्र पोलिसांचा नकार : अनिल देशमुख

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मागणीनंतर अभिनेता सुशांत सिंह रजपूत यांच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी चर्चा होती. मात्र, याला आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पूर्णविराम दिलाय.

अभिनेता सुशांत सिंह रजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाला महिना उलटून गेला आहे. तसेच त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या केली ? याचे गूढ अद्याप पोलिसांना उकललेलं नाही. मात्र, सुशांतची हत्या झालीय असे अनेकजण म्हणत आहेत. त्यामुळे याचा तपास चांगला व्हावा, अशी मागणी होत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र, याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे की, सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येचा तपास ‘सीबीआय’कडे नाही.

आज एका बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे विधान केलंय.

आज अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांनी सुशांतच्या आत्महत्येबाबत देशमुख यांच्यावर प्रश्न विचारण्यात आले. यात सुशांतच्या आत्महत्येचा तपास राज्य सरकार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवणार आहे का?, असा प्रश्न विचारला असता त्यास देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिलाय. ’महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. मुंबई पोलीस याप्रकरणी योग्य दिशेने तपास करताहेत.

पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना एक निवेदन दिले होते. त्यात त्यांनी सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती.

रियावर गुन्हा दाखल
सुशांतच्या आत्महत्येनंतर दीड महिन्यानंतर वडील के. के. सिंह यांनी पाटणा इथलय राजीव नगर येथे सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यासह चौघांविरोधात तक्रार दिलीय. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून सात पानी एफआयआरमध्ये अनेक आरोप केलेत.रियावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक वांद्रे इथल्या सुशांत राहत असलेल्या अपार्टमेंटचा पुन्हा तपास करणार आहे, असे समजते.