सुशांतला हवी होती Ex गर्लफ्रेंड अंकिताच्या आयुष्यात पुन्हा एकदा Entry, अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर उघड झालं गुपित !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता त्याच्या आणि अंकिता लोखंडेच्या नात्याबद्दलही अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. 7 वर्षांच्या लाँग टाईम अफेअरनंतर दोघे लग्न करणार होते. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूत ब्रेकअपनंतरही अंकिताला मिस करत होता. त्याला पुन्हा अंकिताच्या आयुष्यात येण्याची इच्छा होती. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

सुशांतला जाणावायची अंकिताची कमी
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सुशांतला अंकिताची कमी जाणवत असे. एका लाँगटाईम रिलेशननंतर 2016 साली दोघं लग्न करणार होते. परंतु अचानक त्यांचं ब्रेकअप झालं. सुशांत सिनेमात गेल्यानं शुटींगमध्ये खूप बिजी असायचा.

दोघांमध्ये आला दुरावा
सुशांतच्या बिजी असण्यानं अंकितासोबत त्याचा खूपदा वाद होत असे. सुशांत हेही सांगायचा की, तो कुठं आणि का बिजी आहे. प्रेमानं सुरुवात करणारे दोघंही नंतर भांडणावर येत असे. हळूहळू दोघांमध्ये दुरावा वाढू लागला. अनेकदा सुशांत एकटाच दिसत असे. अंकितानं सांगितलं की, ती या नात्यानं खुश नाही आणि तिनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सुशांत आतून तुटला होता
अंकिताच्या दूर जाण्यानं सुशांत तसाच तुटला होता जसा तो त्याच्या आईच्या जाण्यानं तुटला होता. अंकितानं विकी जैनसोबत लग्न केलं. सुशांतनं स्वत:ला सांभाळत करिअरवर फोकस केला होता.