काय.. ‘या’ कारणामुळे ‘डिप्रेशन’मध्ये होता सुशांत सिंह राजपूत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आज मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केली. त्याचा नोकर आणि मित्रांनी पोलिसांना याची माहिती दिली. सुशांतने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पण त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. चार दिवसांपूर्वीच त्याची मॅनेजर दिशा हिचाही इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे सुशांतला मोठा धक्का बसला होता.

कारकिर्दीमध्ये चढउतार

सुशांतने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. तरीही तो डिप्रेशनमध्ये होता, याची अनेक कारणे सांगितले जात आहेत. काहींच्या मते, सुशांतच्या छोट्याशा करिअरमध्ये अनेक चढउतार आले. त्याच्या अॅक्टिंगवर लोकांना विश्वास नव्हता असे नाही, पण त्याचे काही सिनेमे दणकून आपटले होते. अलीकडे रिलीज झालेला त्याचा छिछोरे हा सिनेमा लोकांना चांगलाच आवडला होता.

लव्ह अ‍ॅड ब्रेकअप

सुशांत सिंह राजपूत बॉलिवूडमध्ये आला तेव्हा टीव्ही स्टार अंकिता लोखंडेसोबत तो रिलेशनशिपमध्ये होता. पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवरच सुशांत व अंकिता यांच्यात प्रेम जुळले होते. दोघेही अनेक वर्षे लिव्हइनमध्ये राहत होते. देघेही लग्न करणार असे वाटत असतानाच त्याच्यात अचानक ब्रेकअप झाले होते. अंकितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतचे नाव क्रिती सॅननसोबत जोडले गेले होते. मात्र काही दिवस सोबत राहिल्यानंतर क्रिती व सुशांतचे ब्रेकअप झाले. गेल्या काही दिवसांपासून सुशांत व रिया चक्रवर्ती यांच्यात अफेअरच्या बातम्या आल्या. दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. पण दोघे अनेक वेळा एकत्र फिरताना दिसले होते. सुशांतच्या डिप्रेशनचे कारण त्याची पर्सनल लाईफही मानली जात आहे.

डिप्रेशनवर उपचार सुरु होते

मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत डिप्रेशनवर उपचार घेत होता. तो गेल्या सहा महिन्यांपासून डॉक्टरांच्या संपर्कात होता. औषधे घेत होता. शनिवारी संध्याकाळी सुशांत त्याच्या काही मित्रांसोबत होता. यानंतर रात्री तो झोपायला घरात गेला तो बाहेर पडलाच नाही. सकाळी दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला तेव्हा सुशांत गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.