सुशांत सिंह राजपूत आत्महत्या : ‘त्या’ लाल बॅगेतून अनेक खुलासे, 2 गुपितं झाली उघड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या करून एक महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या दरम्यान पोलिसांनी अनेकांची चौकशी केली असून अद्यापही काही जणांची चौकशी सुरु आहे. सुशांतसिंगच्या आत्महत्या प्रकरणात दररोज एक नवा प्रश्न समोर येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास संपला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता फक्त व्हिसेरा रिपोर्ट मिळणे बाकी आहे.

दरम्यान,सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आणखी दोन महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पोलिसांकडून दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी चौकशी दरम्यान अनेक गोष्टी उघड केल्या होत्या पण आता एक महत्त्वाचे रहस्य समोर आले आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेजवळ लाल बॅगदेखील दिसली होती. ज्याचा खुलासा आता झाला आहे.

सुशांतसिग याने ज्या खोलीत आत्महत्या केली होती त्या खोलीत एक लाल बॅग सापडली होती. या बॅगेची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. याला कारण म्हणजे सुशांतचा मित्र महेश शेट्टीजवळ देखील लाल बॅग दिसली होती. महेश एका फोटोत लाल बॅगेसोबत दिसला होता. ज्यानंतर महेश शेट्टीसुद्धा ट्रोल झाला होता. एका हिंदी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सत्य सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने ज्या खोलीत आत्महत्या केली होती त्या खोलीत आढळलेली लाल बॅग सुशांतची बहिण मीतूची होती. जेव्हा ती सुशांतला पाहण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर गेली तेव्हा ती तिच लाल बॅग घेऊन आली होती.

याशिवाय संजय लीला भन्साळी यांनी सुशांतला केवळ चित्रपटासाठीच ऑफर केली नव्हती, तर त्याची एक्सगर्लफ्रेंड अंकिता लोखंडेलाही या चित्रपटात गाण्याची ऑफर दिली होती. एका रिपोर्टनुसार भन्साळी यांनी एक लावणी तयार केली होती आणि ही लावणी गाण्यास अंकिताने नकार दिला. यानंतर संजय भन्साळी यांनी चित्रपटातील लावणी काढून टाकली. भन्साळी यांनी चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, सुशांतजवळ तीन चित्रपटांची ऑफर होती. पण यश राजशी असलेल्या करारामुळे तो हे करु शकला नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like