समोर आला सुशांत सिंह राजपूतचा ‘विसेरा’ रिपोर्ट !

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अलीकडेच पोलिसांना फायनल पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट मिळाला होता. मुंबईच्या जूहूमधील कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांतचं पोस्ट मॉर्टेम झालं आणि त्याचे ऑर्गन विसेरा रिपोर्टसाठी जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. तेव्हा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण अ‍ॅस्फिक्सिया (Asphyxia) सांगण्यात आलं.

स्फिक्सिया तेव्हा होतो जेव्हा तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. फायनल रिपोर्टमध्येही असं समोर आलं होतं की, फाशी घेतल्यानंच सुशांतचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांना त्याच्या विसेरा रिपोर्टची प्रतिक्षा होती. तो रिपोर्टीही आता आला आहे. यात त्याच्या मृत्यूची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सुशांतच्या विसेरा रिपोर्टमध्ये अशी माहिती देण्यात आलीय की, अभिनेत्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं संशयास्पद रसायन किंवा विष असल्याचं आढळून आलेलं नाही. आता हे स्पष्ट होत आहे की सुशांतनं आत्महत्या केली आहे. मुंबईच्या जूहूमधील कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांतचं पोस्टमॉर्टम झालं होतं.

अनेकांचा असा संशय होता की, सुशांतचा गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली आहे. परंतु तपासात मात्र असं काहीच समोर आलेलं नाही. सुशांतच्या शरीरावर कोणतेही स्ट्रगलिंग मार्क्स नाहीत याशिवाय त्याच्या नखांमध्येही काही आढळलेलं नाही.