SSR Case : आत्महत्येच्या एक दिवस अगोदर सुशांतशी ‘या’ गोष्टी संदर्भात झाली होती चर्चा, टॅलेंट मॅनेजरचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबद्दल दररोज नवे खुलासे समोर येत आहे. आत्महत्या करण्याच्या एकदिवस आधी सुशांत टॅलेंट मॅनेजर उदय सिंग गौरीशी फोनवर बोलला होता. एका हिंदी वृत्तवाहीनच्या रिपोर्टनुसार उदय गौरीशी बोलताना सांगितले की त्याने सुशांतशी काही नवीन प्रोजेक्टबाबत चर्चा केली होती.

नुकतेच उदय गौरीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 13 जून रोजी मी सुशांतशी एका कॉन्फरन्स कॉलद्वारे संभाषण केले होते, त्या कॉन्फरन्स कॉलमध्ये चित्रपट निर्माते रमेश तौराणी आणि निखिल अडवाणी यांचा देखील समावेश होता. आम्ही काही नव्या प्रजेक्ट्ससाठी सशांतला कॉल केला होता. ज्यात सुशांतने इंटरेस्ट दाखवला होता. या व्यतिरिक्त, उदयने हे देखील सांगितले की, सुशांत आमच्या संभाषणादरम्यान पूर्णपणे सामान्य होता आणि स्क्रिफ्टबद्दल उत्साहित होता. त्याच वेळी उदयला जेव्हा सुशांतच्या आत्महत्येबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाले की, एक गोष्ट अशी असू शकते की सुशांत डिप्रेशनमध्ये असावा किंवा फिल्म इंडस्ट्रीमधून त्याला पूर्णपणे वेगळे केले असावे.

दरम्यान, सुशांत सिंह राजतपूच्या आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीआयकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीकडूनही रियाची चौकशी सुरु आहे. यापूर्वी तिचे कॉल डिटेल्सचीही तपासणी करण्यात आले आहेत. रियाने एक्स मॅनेजर श्रृती मोदीला अनेक फोन केले. श्रृती सुशांतची एक्स मॅनेजर होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like