सुशांतच्या ‘थेरपिस्ट’च्या वक्तव्याने आत्महत्या प्रकरणाला नवे वळण !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रोज नवे खुलासे केले जात आहेत. सुरुवातीला त्याच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम आणि आउटसायडर्सना मिळणारी वागणूक यावर वादंग उठले होते. त्यानंतर सुशांतचे वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केली. आता या प्रकरणी सुशांतच्या थेरपिस्टने वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे.

दाव्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, सुशांत नैराश्य आणि बायपोलर या समस्येशी लढत होता. त्याच्या आत्महत्येबददल ’सोशल मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडियावर काही चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे मला यासंदर्भात पुढे यावे लागत आहे. मी सुशांत आणि रियाला अनेक वेळा भेटले आहे. 2019 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यानंतर आता जूनमध्ये देखील रियाशी बातचीत झाली होती.’

या थेरपिस्टच्या म्हणण्यानुसार रिया आणि सुशांतमध्ये प्रेम दिसत होते. रिया फक्त त्याच्या अपॉइंटमेंट घ्यायची नाही तर त्यासाठी उपस्थित राहण्याची हिंमत देखील ती त्याला देत होती. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येला पुन्हा एकदा नवे वळण लागले आहे.