रियाचा सुशांतच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संशयाची वावटळ उठली असतानाच या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी करण्यात येत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. काल ईडीने रियाची तब्बल साडेआठ तास चौकशी करत तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. या चौकशीनंतर रियानं तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत सुशांतच्या कुटुंबावरच गंभीर आरोप केले.

सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत, त्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत खटला दाखल केला असल्याचे रियाने म्हटल असल्याची माहिती आहे. तसेच माझं आणि सुशांतचं नात त्याच्या घरच्यांना मान्य नव्हतं. पण सुशांतला माझ्यासोबतचं नातं तोडायचं नव्हतं. त्यामुळं त्याने त्याच्या कुटुंबियांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, असे तिने म्हटल आहे. मला फसवण्यामागं सुशांतच्या भावोजींचं सर्व षड्यंत्र असल्याचा आरोप तिने केला आहे.

ईडीकडून रियाची 8 तास चौकशी
सुशांत सिंह आत्महत्ये प्रकरणात पटणा पोलिसांनी रिया चक्रवर्ती व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या आधारे ईडीने शुक्रवारी मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी सुरु केली. काल चौकशीच्या पहिल्या फेरीत रियासह तिचा भाऊ शौविक, वडील तेच सुशांची एक्स मॅनेजर श्रृती मोदी यांची चौकशी करण्यात आली. रियाची 8 तास चौकशी करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाने रियाचा अर्ज फेटाळला
जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, ही विनंती घेऊन रियानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने रियाचा विनंती अर्ज फेटाळला. त्यामुळं ईडीकून बाजवाण्यात आलेल्या समन्सनुसार रियाला आजही ईडीचे कार्यालय गाठावे लागले. रिया आणि इतरांच्या चौकशीनंतर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. ईडीने त्याला देखील समन्स बजवाले आहे.

रियाने सुशांतपेक्षा त्याच्या मॅनेजरला केले जास्त कॉल
रिया चक्रवर्तीचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स समोर आले आहेत. त्यानुसार रियाने सुशांतपेक्षा त्याची एक्स मॅनेजर श्रृती मोदीला जास्त कॉल केल्याचे कळतेय. यांसोबत तिने सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मरांडासा याला देखील सर्वाधिक कॉल केल्याचे समोर आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like