खुपच ‘शानदार’ आणि ‘दिलदार’ होता अभिनेता सुशांत सिंह राजपूत, बॉलिवूडसाठी 2020 अत्यंत वाईट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधून खूप वाईट बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहचले आहेत. वृत्तानुसार सुशांत सिंह च्या नोकराने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. आत्महत्येमागील कारण समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

अलिकडेच त्याच्या एक्स मॅनेजरनेही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. असे बोलले जातेय की सुशांत नैराश्येत होता. तो अनेक दिवसांपासून आपल्या करिअरबद्दल चिंतेत होता आणि भविष्याबाबत काळजीत होता. त्यांच्यातील सबंधांमध्ये तणाव होता हेच कारण सांगितले जात आहे. अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपनंतर अंकिताचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले जात आहे. एकंदरीतच तो मानसिक तणावात होता आणि तो मीडियापासून खूप दूर रहात होता.

सुशांत सिंह राजपूत याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टीव्हीवरून केली. प्रथम त्याने टीव्ही मालिका किस देश में है मेरा दिल मध्ये काम केले होते. एकता कपूर यांची मालिका पवित्र रिश्ता या मालिकेपासून त्याला ओळखले जाऊ लागले. यानंतर त्याने आपले फिल्मी करिअर सुरु केले आणि मागे वळून पाहिलेच नाही. त्याच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले.

तो शुद्ध देशी रोमांस यामध्ये वाणी कपूर आणि परिणिती चोपडा यांच्यासोबत चित्रपटात दिसला. त्याने एम.एस.धोनी या चित्रपटात काम केले होते आणि या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांची कमाई केली होती. याशिवाय तो सोनचिडियां आणि छिछोरे चित्रपटात दिसला होता. त्याचा अखेरचा चित्रपट केदारनाथ होता ज्यामध्ये त्याने सारा अली खान सोबत काम केले होते.

वर्ष 2020 हे बॉलीवूडसाटी वाईट राहिले आहे. याच वर्षात अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर यांच्यासारख्या बड्या कलाकारांचा मृत्यू झाला. आता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडला हादरून टाकले आहे.