SSR Death Case : सुशांत सिंह राजपूतच्या ‘बॉडीगार्ड’ची ED करणार चौकशी

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आतापर्यंत रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंबीय, रियाचा मॅनेजर आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिथानी यांची चौकशी केली आहे. आता ईडीने सुशांतच्या बॉडीगार्डला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात किंवा अन्य कुठल्या अनियमितता आढळल्या त्याबद्दल बॉडीगार्डची जबानी नोंदवण्यात येणार आहे.

मनी लाँडरिंगच्या प्रकरणात ईडीच्या अधिकार्‍यांनी सुशांत सिंह राजपूतची बहिण मीतू सिंहची चौकशी केली. सुशांतचे वडिल के.के.सिंह यांनी पाटण्याणध्ये रिया चक्रवर्तीविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या अकाऊंटमधून 15 कोटी रुपये काढून घेतले तसेच त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले असा आरोप सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. रिया चक्रवर्तीची ईडीने आतापर्यंत दोनदा चौकशी केली आहे. अभिनेते शेखर सुमन यांनी रियाच्या अटकेची मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यांनी संस्कृतमधील एक श्लोक पोस्ट करुन रियाच्या विचारसरणीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, ऑक्टोबर 2019 मध्ये सुशांत व रिया युरोपला फिरायला गेले होते. या ट्रिपदरम्यान काय घडले त्याचा खुलासा रियाने ईडीकडे केला आहे. फ्लॉरेन्समध्ये आम्ही एका 600 वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या हॉटेलमधील रुम्स फार प्रशस्त होत्या आणि भितींवर विविध पेंटिंग्स लावले होते. त्यातील एका पेंटिंगला पाहून सुशांत फार घाबरला होता. तो अचानक रुद्राक्षची माळा घेऊन जप करू लागला होता. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती खराब होऊ लागली होती, असे रियाने सांगितले आहे.