सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी प्रसिद्ध वकील मांडणार रियाची बाजू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात खळबळजनक आरोप केले आहेत. याप्रकरणी बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यात जामीन मिळवण्यासाठी रियाने अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढणार्‍या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या मानशिंदे यांना नेमले आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी तब्बल दीड महिन्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरूद्ध फिर्याद दाखल केली. पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, बिहार पोलीस सध्या मुंबईत तपासासाठी दाखल झाल्याचे वृत्त आहे. रियावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याबरोबरच इतरही गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी रिया चक्रवर्तीने प्रयत्न सुरू केले असून, अभिनेता सलमान खान व संजय दत्तची बाजू मांडणारे नामांकित वकील सतीश मानशिंदे यांना बाजू मांडण्यासाठी नेमले आहे. सतीश मानशिंदे यांनी यापूर्वी अभिनेता सलमान खान व संजय दत्त या दोघांच्या केस लढल्या आहेत. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान व 1993मधील बॉम्बस्फोट प्रकरणात अडकलेल्या अभिनेता संजय दत्तची बाजू मांडणारे वकील मानशिंदे अभिनेत्री रिया चक्रवर्तीची केस लढणार आहेत.