सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला, वडिलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचं कुटुंब आता न्यायासाठी लढा देत आहेत. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल असा निर्णय दिला. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला. सीबीआयच्या तपासाला मंजूरी मिळाल्यानंतर सुशांतसिंहच्या वडिलांनी केके सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केके सिंह यांनी एक विधान केलं आहे.

सुशांतच्या वडिलांचे स्टेटमेंन्ट

सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या संपत्तीचा कायदेशीर वारस म्हणून स्वत:चं नाव दिलं आहे. केके सिंह यांनी मी सुशांतसिंह राजपूतच्या संपत्तीचा कायदेशीर वारस आहे. सुशांतने ज्या वकील, सीए आणि इतर कर्मचाऱ्यांना ठेवले होते आणि अन्य लोकंही जे त्याच्यासाठी काम करत होते ते आता सर्व संपलं आहे. आता त्यांना सुशांतबद्दल सांगण्याचा किंवा बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अस स्टेटमेंन्ट सुशांतच्या वडिलांनी दिलं आहे.

तर माझी परवानगी घ्यावी लागेल

जर सुशांतसंदर्भात कोणाला काही बोलायचे असेल तर त्यांना आधी माझी परवानगी घ्यावी लागेल. सुशांतच्या कुटुंबात आता मी आणि त्याच्या बहिणींचा समावेश आहे. मीडियामध्ये काही वकिलांनी ते सुशांतसाठी काम करायचे असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सुशांतसोबत झालेल्या संभाषणाबद्दल सांगितलं.पण बार काऊन्सिल ऑफ इंडिया आणि भारतीय पुरावा कायद्याच्या नियमांनुसार हे करता येणार नाही.

वरुणसिंह आमचे वकील असतील

वरुणसिंह यांना आम्ही आमचा वकील म्हणून नेमले आहे आणि त्यांच्यामार्फत ज्येष्ठ वकील विकास सिंह आमच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतील. जर दुसरं कोणी कुटुंबाचा सदस्य असल्याचा दावा करत असेल तर मी त्याची परवानगी देत नाही, असं देखील केके सिंह यांनी म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.