शेखर सुमन, संदीप सिंहवर सुशांतच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप, म्हणाले – ‘नौटंकी करतायेत हे लोक’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेता शेखर सुमन, निर्माता संदीप सिंह आणि आरजेडी नेता व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवसोब घेतल्या प्रेस कॉन्फरंसला अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी राजकीय नौंटकी असं म्हटलं आहे. शेखरनं अभिनेत्याच्या पाटण्यातील घरी जात संवेदना व्यक्त केल्या आणि नंतर यादव सोबत मिळून एक पत्रकार परिषद आयोजित केली.

एका इंग्रजी रिपोर्टनुसार, सुशांतच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे की, शेखर अभिनेत्याच्या अकाली निधनातून राजकीय फायदा घेत आहे. असं यासाठी म्हटलं आहे. कारण कथितरित्या पत्रकार परिषदेनंतर तो राष्ट्रीय जनता दल मध्ये सामील होण्यासाठी एकदम तयार होता. याच रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलंय की, या प्रेस मीटबद्दल त्याच्या कुटुंबीयांना जास्त माहिती नव्हती.

सुशांतच्या कुटुंबीयांच्या हवाल्यानं वेबासाईटनं सांगितलं की, मुंबईत प्रकरणाचा तपास सुरु आहे. एखाद्या पॉलिटीकल बॅनरखाली पाटण्यातील मीडियासोबत या संदर्भात बातचित करण्याचा हेतू राजकीय लाभ घेणं आहे. या सगळ्या संबंधित सुशांतचे कुटुंबीयदेखील मागणी करण्यास सक्षम आहेत. आमच्या कुटुंबात राजकरणाशी जोडलेली लोकं आहेत जे हे सगळं करू शकतात. आम्हाला कोणत्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेपाची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

एका रिपोर्टनुसार, तेजस्वी यादव आणि शेखर सुमनसोबत स्टेड शेअर केल्यानं सुशांतचे कुटुंबीय संदीप सिंहसोबतही नाराज आहेत. पत्रकार परिषदेत कोणत्याही राजकीय नेत्याची उपस्थिती अभिनेत्याच्या कुटुंबीयांना आवडलेली नाही.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like