देव तारी त्या ‘वीरा’स कोण मारी ; पुलवामासह २ चकमकीतून वाचलेल्या वीर जवानांची कहाणी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – ‘देव तारी त्याला कोण मारी’ हि म्हण मराठीत प्रसिद्ध असणारी म्हण लष्कराचे जवान असलेल्या सुशांत वीर यांनी खरी करून दाखवली आहे. देशभक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे ‘वीर’ कुटुंब सातारा जिल्ह्यातील रुई गावचे रहिवासी आहे. गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या प्राणघातक स्फोटातून प्रशांत वीर हे जवान बचावले आहेत. तसेच या आधीही छत्तीसगड येथे तैनात असताना नक्षलवाद्याशी दोन हात करताना त्यांना शरीरावर गोळ्या झेलाव्या लागल्या आहेत. अशा दोन भीषण हल्ल्यातून प्रशांत वीर हे बचावले आहेत.

कोरेगाव तालुक्यातील रुई गावचे ‘वीर’ कुटुंब देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. कारण एकाच कुटुंबातील तीन भाऊ भारतीय लष्करात कार्यरत आहेत. रुई गावाच्या ग्रामस्थांना त्याच्या गावातील या कुटुंबाचा नितांत अभिमान वाटतो आहे. मागे सुशांत वीर हे छत्तीसगडमध्ये कर्तव्य बजावत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर होणारे उपचार पूर्ण होताच सैन्यात परतण्याचा निर्णय घेतला. सेवेवर रुजू झाल्यावर त्यांची काश्मीर मध्ये बदली झाली. त्यानंतर ते गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून सुद्धा बचावले आहेत. त्यामुळे त्यांच्या गावाकडे त्यांच्या शौर्याची आणि त्याच्या देशसेवेची चर्चा रंगली आहे.

रुई गावात नांगरे वस्तीवर वास्तव्यात असलेल्या प्रमोद वीर यांची तीन मुले सैन्यात भरती झाली. शेतीचा व्यवसाय करणाऱ्या प्रमोद वीर यांचा थोरला मुलगा प्रवीण वीस वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाला. त्यानंतर त्याच्या सारखेच आपण देशसेवेत जाण्याचे प्रवीणच्या लहान दोन भावांनी ठरवले. त्यानंतर प्रशांत आणि सुशांत हे दोघे भाऊ अनुक्रमे सोळा आणि चौदा वर्षांपूर्वी भारतीय लष्करात भरती झाले. कोरेगाव तालुक्यातील रुई या गावची साधारण १०० हुन अधिक मुले आज भारतीय लष्करात कार्यरत आहेत.

सुशांत वीर हे सीआरपीएफच्या ५४ बटालियनमध्ये हवालदार म्हणून सैन्यात कार्यरत आहेत. २०१५-१६ मध्ये ते छत्तीसगड येथे कार्यरत होते. त्याच वेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यात नक्षलवाद्यांची गोळी लागली. तसेच त्यांच्या अंगाला तीन गोळ्या चाटून गेल्या. त्यावेळी ते गंभीर जखमी झाले होते. या नक्षली हल्ल्यात त्यांच्या लष्कराच्या तुकडीने नक्षलवाद्यांवर मोठे यश मिळवले होते.

सुशांत वीर आणि यांचे बंधू प्रवीण वीर हे दोघे सैन्यात श्रीनगर येथे कर्तव्य बजावत आहेत. तर त्याचा मधले बंधू प्रशांत हे लेह मध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत. सुशांत वीर यांचे आई वडील शेतकरी आहे. पत्नी स्नेहल या हि रुईमध्ये आपल्या सासू सासऱ्यांना घरकामात मदत करतात. सुशांत वीर यांना दोन मुली आहेत. संस्कृती व संयुक्ता अशी त्या मुलींची नावे आहेत.