Sushil Chandra : सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल रोजी ते आपल्या पदाचा पदभार ग्रहण करतील. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याची परंपरा आहे. त्यानुसारच सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुशील चंद्रा हे मंगळवारी (दि. 13 एप्रिल) रोजी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्विकारतील. सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी सुनील अरोडा हे सांभाळत आहेत. मात्र,13 एप्रिल नंतर चंद्रा हे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहतील. त्यांचा कार्यकाल हा 14 मे 2022 पर्यंत आहे. चंद्रा यांची 14 फेब्रुवारी 2019 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते मुख्य निवडणूक आयुक्त बनणार आहेत. निवडणूक आयोगात कार्यरत होण्यापुर्वी सुशील चंद्रा हे CBDT चे अध्यक्ष होते. चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोग मणिपुर, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका घेणार आहे. या सर्व राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाल हा पुढील वर्षाच्या मार्चमध्ये वेगवेगळया तारखेला पुर्ण होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाल हा पुढच्या वर्षी 14 मे रोजी पुर्ण होत आहे.